"रंगपंचमी" शेवटी आठवणी राहतात,प्रेमाची माणसं आपल्याला सोडून जातात आणि मागे ठेवून जातात छान आठवणी,सप्तरंगी आठवणी,त्याच आठवणींवर आपल्याला आपला आयुष्य जगण्याची उमेद मिळते,आयुष्य बेरंग नाहीतर खूप रंगीबेरंगी आहे,एकमेकांवर प्रेम करावे,सगळ्यांचं चांगलं चिंताव,लोकांना जितकी मदत करता येईल तेवढी करावी,
लोकांच्या आयुष्यात रंग भरावेत,अशाच पद्धतीने माझीआई तीच आयुष्य जगली,रंगपंचमीच्या दिवशी तिची खुप म्हणजे खूपच आठवण येते,पण माझ्या आजूबाजूच्या ज्या ज्या माउल्या आहेत त्या सगळ्यांच्या रूपात माझी माय माझ्या आयुष्यामध्ये रंग भरत असते.